Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खेळाडू गौरवाने पुण्यात खाशाबांची 100 वी जयंती साजरी

पुणे : भारताचे पहिले वयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांची 100 वी जयंती बुधवारी (दि.१५) पुण्यात राष्ट्रीय क्राडापटूंचा गौरव करून साजरी करण्यात आली.

वारजे येथिल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फीनिटी जिम्नॅस्टिक्स हाॅलमधील कार्यक्रमात खाशाबांचे पोस्टर व खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देऊन ९ राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला . यावेळी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक अजित जरांडे, लेखक संजय दुधाणे, मानसी करमरकर, प्रवीण भैरवकर, मोहन जरांडे, अभिषेक मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातील खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन अजित जरांडे, संजय दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा –  वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; उच्चभ्रू सोसायटीत कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड

प्रा. संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या आठवणींना उजाळा दिला. 1948 मध्ये खाशाबा जहाजाचा प्रवास करून लंडन ऑलिम्पिकला गेले होते असे सांगून दुधाणे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि गुरूनिष्ठा असल्याने खाशाबांनी देशासाठी पहिले ऐतिहासिक कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

अजीत जरांडे यांनी राज्य क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी करमरकर यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button