Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

होर्मुझ सामुद्रधुनीजवळ दोन भारतीय तेलवाहू जहाजांवर गोळीबार; सुरक्षिततेसाठी मार्ग बदलले

Strait of Hormuz | होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ दोन भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही. ‘एनबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या या समुद्री मार्गावरील वाढत्या सुरक्षाधोक्याबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेदरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. एका जहाजावरून पाठवण्यात आलेल्या संदेशात एका कर्मचाऱ्याने, “तुम्हीच आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिलीत आणि आता तुम्हीच गोळीबार करत आहात… आम्हाला मागे फिरू द्या,” अशी विनंती केल्याचे सांगण्यात आले. एनबीसी न्यूजने मिळवलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये ‘सन्मार हेराल्ड’ हे जहाज खाडीतील ‘ग्रीन एरिया’मध्ये प्रवास करताना दिसत असून, एका टप्प्यावर जहाजाची ‘ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम’ (AIS) बंद करून नंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याची नोंद आहे.

हेही वाचा     :                  “कामाला लागा! तीन वर्षांनी भगवा फडकवायचा आहे…!” एकनाथ शिंदे यांची साद…

गोळीबार नेमका कोणी केला, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही. मात्र, ज्या भागात नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत, त्याच परिसरात ही घटना घडल्याचे अहवालातून समोर आले आहे. एका टँकरच्या कॅप्टनच्या माहितीनुसार, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’शी संबंधित दोन युद्धनौकांनी जहाजांच्या जवळ येत गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, इराणमधील माध्यमांनी हा गोळीबार जहाजांना मार्ग बदलण्याचा इशारा देण्यासाठी केलेले ‘वॉर्निंग शॉट्स’ असल्याचा दावा केला आहे.

भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जहाजांना विशेष लक्ष्य करण्यात आले नव्हते. सामान्य परिस्थितीत झालेल्या गोळीबाराच्या कचाट्यात ही जहाजे सापडली असावीत, असे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले असून, सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button