माटे प्रशालेचा शंभर टक्के निकाल
शिक्षण विश्व: घवघवीत यशाची परंपरा कायम

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
मोरया शिक्षण संस्था चिंचवड, पुणे संचलित व्ही. के. माटे शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले. प्रशालेचा यंदा १०० टक्के निकाल लागला आहे.
प्रशालेतील ४२ विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्या पुढे गुण मिळवून यश संपादन केले आहे. प्रशालेतील जोशी अद्वैत गोपालकृष्ण याने ९८ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
धुमाळ किमया संदीप हिने ९७ टक्के गुण मिळवून प्रशालेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. टाले श्रद्धा धनंजय हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रशालेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा : दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या
यावर्षी प्रशालेतील एकूण २२४ विद्यार्थी हे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेस बसले होते त्यापैकी १३५ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता गुण (Distinction) मिळवले आहते. तर ६१ विद्यार्थ्यांनी हे प्रथम श्रेणी गुण आणि २७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी गुण मिळवून यश संपादन केले आहे.
मोरया शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शकुंतला माटे, संस्थेच्या कार्यवाह तथा प्रशालेच्या मुख्याध्यापिका इंद्रायणी माटे पिसोळकर, संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील ज्ञानेश्वर शेडगे, संस्थेचे खजिनदार रणजित सावंत तसेच संस्थेचे विश्वस्त रुत्विक पिसोळकर यांनी प्रशालेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालंकाचे तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा