गांजा ओढणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी | प्रतिनिधी
मोरवाडी पिंपरी येथे एका मैदानाच्या बाजूला गांजा सेवन करणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 6) दुपारी सव्वाएक वाजता करण्यात आली.
राघवेंद्र परमेश्वर बल्लोळी (वय 23, रा. नेहरूनगर, पिंपरी), इरफान इस्माईल सय्यद (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी पिंपरी येथील बाबू नायर मैदानाच्या एका बाजूच्या कठड्यावर आरोपी रविवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास गांजाचे सेवन करत बसले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.





