ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा संघटनात्मक बांधणीवर ‘‘फोकस’’!

संघटनात्मक नियुक्ती: वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी, क्रीडा प्रकोष्ट अध्यक्षपदी अरुण पाडुळे!

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षसंघटना अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा संघटनेत विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शहराध्यक्ष Shatrughan Kate यांच्या हस्ते पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.

या अंतर्गत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय पटनी यांची पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर पक्षाच्या विविध आघाड्यांवरही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची भाजपा क्रीडा प्रकोष्ठ शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रमोद परदेशी यांची दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती मंडलाध्यक्ष, तर अजय साने यांची चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांच्या मार्गदर्शनाखाली “शेवटच्या घटकाचा विकास” या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेसाठी कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

“भारतीय जनता पक्षाची ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर निष्ठावंत व कार्यक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शेवटच्या घटकाचा विकास’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील. आगामी काळात पक्ष संघटन अधिक गतिमान करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button