Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

To The Point: मोईतील आगीच्या घटनेमुळे कुदळवाडी कारवाईची दाहकता ‘अधोरेखित’’

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेला मिळाली ‘पुष्टी’ : एकेकाळी हरीत असलेली कुदळवाडी प्रदूषित झाली कशी?

पुणे । पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत असलेल्या मोई येथे एका भंगार दुकानाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे कुदळवाडी अतिक्रमण विरोधी कारवाईच्या आठवणी ताज्या झाल्या. वाढते आगींच्या घटना, राष्ट्रीय सुरक्षा आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासाठी केलेली कुदळवाडीची कारवाई ही काळाची गरज होती, असे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी ज्या ठिकाणी टाळ ठेवले. असे वारकरी व अध्यात्मिक वारसा असलेले टाळगाव चिखली गावची एक वाडी म्हणजे आजची कुदळवाडी आहे. चिखलीचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज यांचे पुरातन मंदिर कुदळवाडीत आहे. हरगुडेवस्ती- पवारवस्ती- बालघरे वस्ती- जाधववाडीचा काही भाग म्हणून ओळखला जातो.

सुमारे 40 वर्षांपूर्वी ग्रामस्थांचा मुख्य व्यावसाय शेती, दूध उत्पादन हा उत्पन्नाचा स्त्रोत होता. पिंपरी-चिंचवडमध्ये 1954 मध्ये हिंदूस्थान ॲन्टिबायोटिक्स कंपनीची निर्मिती झाली. त्यानंतर 1960-70 च्या दशकात औद्योगिक कंपन्या स्थापन होवू लागल्या. बजाज, टेल्को, बजाज टेम्पो, प्रिमिअर, रस्टन, आडवाणी, कायनेटिक इंजिनीअरिंग असा कंपन्या निर्माण झाले. तोपर्यंत आजची कुदळवाडी हरित होती. शेती होती. मात्र, अवघ्या 30 ते 40 वर्षांत कुदळवाडी प्रदूषित झाली ती का? याचे आवलोकन केले पाहिजे.

… असे झाले ‘भंगारवाडी’चे स्थलांतर!

पिंपरी-चिंचवड एमआयडीसी क्षेत्रातून निर्माण होणारा औद्योगिक कचरा पूर्वी आकुर्डी येथे टाकला जात होता. त्याठिकाणी ‘‘भंगारवाडी’’ तयार झाली. मात्र, औद्योगिक क्षेत्राचा विस्तर झाला. तसा या भागातील भंगार व्यापाऱ्यांनी कुदळवाडी भागात स्थलांतर होवू लागले. भौगोलिक दृष्टया कुदळवाडी हा भाग औद्योगिक क्षेत्रालगत असल्यामुळे या भागात औद्योगिक कंपन्यांना लागणारे छोटे पार्ट पुरवठा करण्यासाठी लघु उद्योग निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात भंगार व्यासायिकांनी या भागात भाड्याने किंवा विकत जमीन घेतली आणि कुदळवाडीची ओळख ‘‘भंगार हब’’ अशी होवू लागली.

कुदळवाडी गावचे गावपण हरपले?

भंगार व्यावयासामुळे कुदळवाडीचे गावपण हरपले. मुस्लिम लोकवस्ती प्रचंड वाढली. धार्मिक तेढ निर्माण होईल, असे चित्र झाले. त्याप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळाले. राष्ट्र सुरक्षा आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत कृतींचे ‘कनेक्शन’ कुदळवाडीसोबत जोडले जावू लागले. महानगरपालिकेत चिखली-कुदळवाडीचा समावेश झाल्यानंतर नागरिकरण प्रचंड वाढले. वारंवार आगीच्या घटना आणि प्रचंड धुराचे लोट, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणामुळे सभोवतालच्या नागरिकांना, सोसायटीधारकांना त्रास होत होता. अनधिकृत बांधकांचे जाळे या भागात निर्माण झाले. कुदळवाडीचे गावपण अरक्षरश: हरपले, असे निरीक्षण जुने-जाणते नोंदवतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button