ताज्या घडामोडीराजकारण

रोहिणी खडसे यांचा भाजपला खोचक टोला

'बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या… विजयी उमेदवाराच्या अर्धी मतंही नाहीत'

पुणे : सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीवरून पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. पैशाचा वारेमाप वाटप करूनही पराभव झाला असे म्हणत रोहिणी खडसे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या… विजयी उमेदवाराच्या अर्धी मतंही नाहीत, असं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं आहे. कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत विजयी झाला.

 हेही वाचा –  तनिषा भिसे प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा

21 पैकी 21 जागा जिंकत विरोधी भाजपाच्या दोन्ही पॅनेलचा पराभव माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलकडून करण्यात आला आहे. 7 हजार 500 ते 8 हजार मतांच्या फरकाने सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपा आमदार मनोज घोरपडे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनेलचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button