गवळीनगर प्रभाग-5 मध्ये ‘‘व्हीजन विकासाचे, कमळ विश्वासाचे’’ नारा!
मिशन- PCMC : कविता भोंगाळे यांच्यासह पॅनेलच्या प्रचाराला नागरिकांची साथ

पिंपरी-चिंचवड : “व्हीजन” विकासाचे, “कमळ” विश्वासाचे… या घोषवाक्याला अनुसरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रभागातील चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून, त्यात कविता भोंगाळे यांच्या प्रचाराकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक आणि भाजपाच्या अधिकृत उमेदवार कविता भोंगाळे या सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या, विकासाभिमुख आणि संघटन कौशल्य असलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून “विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार” प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न दिसून येतो.
हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील गोळीबाळासारखी घटना मुंबईत घडू शकते; बांगलादेशी घुसखोरीवरून भाजपचा इशारा
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत कविता भोंगाळे यांनी प्रभागातील समस्या समजून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडला आहे. “विकासासाठी अनुभव आणि विश्वास आवश्यक असतो, आणि तो विश्वास नागरिकांनी भाजपावर दाखवला आहे,” असे त्या सांगतात. त्यांच्या प्रचाराला महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपा उमेदवार अ- अनुराधा देविदास गोफणे, ब- सागर बाळासाहेब गवळी, क- कविता भोंगाळे आणि ड- जालिंदर किसान शिंदे यांना विजयी करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मात्र, विकासकामांचा ठोस अजेंडा, लोकांशी जोडलेली शैली आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे कविता भोंगाळे या प्रचारात विशेष केंद्रस्थानी राहिल्या आहेत. एकूणच, “म्हणून, पुन्हा भाजपाचा निर्धार..!” या भूमिकेसह प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपाचा प्रचार वेग घेत असून, कविता भोंगाळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा “व्हीजन” प्रत्यक्षात उतरवण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक ५ मधील प्रत्येक नागरिकाचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचारातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा ठाम निर्धार आहे.”
— कविता भोंगाळे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 5.



