न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांचे शाळेकडून कौतुक

पिंपरी चिंचवड : न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगाव आमच्या शाळेचा शाळेची 100 टक्के निकालाची परंपरा यंदाच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांनी अखंडित ठेवली आहे.
पहिले पाच विद्यार्थी वैभवी मंडलिक (92.40%),
समीक्षा वाघमारे (91.80%),
क्षितिजा जावीर (91.00%),
सुजित चौबे ( 90.80%),
हर्षदा जाधव (90.40%), यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
हेही वाचा – एस. बी. पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
यावर्षी इयत्ता दहावी मध्ये एकूण 76 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 90 %पेक्षा जास्त गुण घेतलेले पाच विद्यार्थी
80% पेक्षा जास्त गुण घेतलेले 21 विद्यार्थी आहेत.70% जास्त गुण घेतलेले 26 विद्यार्थी आहेत.
60% जास्त गुण घेतलेले 16 विद्यार्थी आहेत.व 50 % जास्त गुण घेतलेले आठ विद्यार्थी आहेत.
शाळेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल सर्व पालक वर्ग तसेच थेरगाव, रहाटणी, डांगेचौक परिसरात शाळेत शाळेचे नाव लौकिक झालेला आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात आल्या