Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…ऑस्ट्रेलियातील गोळीबाळासारखी घटना मुंबईत घडू शकते; बांगलादेशी घुसखोरीवरून भाजपचा इशारा

मुंबई : मुंबईतील विविध भागांतील सार्वजनिक जमिनींवर योजनाबद्ध पद्धतीने अतिक्रमण केले जात आहे. बेकायदेशीर बांधकामे उभी करुन तेथे बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना वसविले जाते. त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र मिळवून देण्यात मदत केली जाते. त्यामुळे त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट होतात आणि त्यांच्यामार्फत ‘व्होट जिहाद’ ही केला जातो, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी बुधवारी केला आहे. बांगलादेशी व रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे मुंबईच्या सुरक्षेला धोका असून परिस्थिती नियंत्रणात आणली नाही, तर ऑस्ट्रेलियातील बाँडी बीच येथे झालेल्या सामूहिक गोळीबारासारख्या घटना मुंबईत गिरगाव चौपाटीवरही घडू शकतात, असा इशारा साटम यांनी दिला आहे.

मुंबईत एका विशिष्ट समुदायाकडून होत असलेल्या शांत लोकसंख्यात्मक व सांस्कृतिक आक्रमणाबाबत साटम यांनी चिंता व्यक्त केली. ही अतिक्रमणे, घुसखोरी आणि मतपेढीच्या राजकारणासाठी नियोजित कार्यपद्धती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने मुंबईत किती बांगलादेशी घुसखोरांना वसविले, असा सवाल साटम यांनी उपस्थित केला. मालवणी, मालाड, मानखुर्द, देवनार आणि कुर्ला या भागांमध्ये ‘राजकीय आशीर्वादाने’ लाखो बेकायदेशीर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा –  सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अहवालाचा दाखला देत आमदार साटम यांनी मुंबईतील लोकसंख्यात्मक रचनेतील बदलांकडे लक्ष वेधले. टीआयएसएस अहवालानुसार, मुंबईत १९५१ मध्ये हिंदू लोकसंख्या ८८ टक्के होती. ती २०११ मध्ये कमी होवून ६६ टक्के इतकी झाली आहे. त्याच कालावधीत मुस्लिम लोकसंख्या ८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. दक्षिण मुंबईतील मतदारसंख्या कमी होत असताना, २०१७ च्या तुलनेत मालवणी, मालाड–मढ, कुर्ला आणि चांदिवली या प्रभागांतील मतदारसंख्या जवळपास ५० टक्क्यांनी कशी वाढली? मालवणीतील जवळपास १० हजार बेकायदेशीर इमारती कोणाच्या मालकीच्या आहेत, त्यात कोण राहतो, त्यांना मतदारयादीत कोणी स्थान मिळवून दिले, आदी प्रश्न साटम यांनी उपस्थित केले.

वाढती गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या तस्करीशी घुसखोरीचा संबंध असून साटम यांनी बंगळुरू पोलिसांनी नुकतीच अटक केलेल्या एका परदेशी विद्यार्थिनीच्या प्रकरणाचा उल्लेख केला. विद्यार्थी व्हिसावर आलेली ही महिला घाटकोपर व नालासोपारा परिसरात कशी राहू शकली, तिला आश्रय कोणी दिला, असे सवाल साटम यांनी केले. मुंबई पोलिसांनी २०२५ मध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी एक हजारहून अधिक बांगलादेशींना देशाबाहेर पाठविले असून ही संख्या दरवर्षी वाढत आहे. राजकीय शक्तींच्या सहभागाने चालणाऱ्या संघटित गुन्हेगारीमुळे मुंबईच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचेही साटम यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button