स्वरा कदम हिचे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश!
शिक्षण विश्व: इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या स्वरा कदमला 94 टक्के

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भोसरी इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेची विद्यार्थिनी स्वरा विकास कदम हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले. स्वरा कदम हिला दहावीच्या परीक्षेमध्ये 94 टक्के गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. राज्याचा यंदाचा निकाल 94 टक्के लागला असून यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
दरम्यान भोसरी इंद्रायणी नगर येथील प्रियदर्शन शाळेचे विद्यार्थ्यांनी स्वरा कदम हिने दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले. स्वरा कदम हिला दहावीच्या परीक्षेमध्ये 94 टक्के गुण मिळाले आहेत. अभ्यासाचा वक्तशीरपणा, सोशल मीडियापासून लांब राहिल्यानंतर व्यवस्थित अभ्यास होऊ शकतो असे मत यानिमित्ताने स्वरा कदम हिने व्यक्त केले आहे.