पिंपरी / चिंचवड

सुलक्षणा शिलवंत- धर यांनी स्वाभिमान टिकवला!

मिशन- PCMC : राष्ट्रवादी श.प. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे गौरोवोद्गार

पिंपरी-चिंचवड : राजकीय आमिष असतानाही सुलक्षणा शिलवंत-धर यांनी स्वाभिमान टिकवला. विचारांशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी विचार सोडला नाही. आदरणीय शरद पवार साहेबांसोबत ठामपणे उभा राहिल्या. राजकारणातून त्यांना उध्वस्थ करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी माघार घेतली नाही. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास त्यांना मोठे पद देण्यात येईल, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.

प्रभाग क्रमांक २०, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर ही प्रचारसभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर व सौ. नीलम संतोष म्हात्रे यांच्यासाठी सोमवारी (दि. १२ जानेवारी २०२६) सायंकाळी ७ वाजता संत तुकाराम महाराज पुतळा येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश

यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी मतदारांना ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. मतदान गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.

तुफान प्रतिसाद अन्‌ विजयी रॅली…

प्रभाग क्रमांक २० मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा तुफान प्रतिसाद लाभल्याने ही रॅली अक्षरशः विजयी रॅलीत रूपांतरित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाच्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या विजयाची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसून आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button