प्रभाग क्रमांक ३ मधील “विकास आमचा ध्यास”, “जनता आमचा विश्वास”
मिशन-PCMC : नितीनआप्पा काळजे यांचे मतदारांना आवाहन

पिंपरी-चिंचवड | चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांनी प्रभागातील निवडणूक रणांगणात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले.
मोशी येथील जांभुळकर वस्ती, आदर्शनगर, शिवाजीवाडी आणि सभोवतालच्या परिसरात उमेदवारांचे आगमन होताच ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि महिला भगिनींकडून औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
प्रचार रॅलीची सुरुवात मा. महापौर व उमेदवार मा. नितीनआप्पा काळजे, श्री. सचिनभाऊ तापकीर, सौ. अर्चनाताई सस्ते आणि सौ. सारिका गायकवाड यांनी केली. नागरिकांनी मागील दहा वर्षांतील विकासकामांचे कौतुक केले आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उलगडा झाला.
हेही वाचा : विद्यार्थ्यांचा पत्रातून पालकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश
भोसरी विधानसभेचे आमदार श्री. महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास कार्यान्वित झाला असून, नागरिकांनी महापौर मा. नितीनआप्पा काळजे यांना मतपेटीतून भरभरून प्रेम दिले. आता संधी हॅट्रिक करण्याची असून, नागरिकांनी चारही उमेदवारांना मतदान करून यशस्वी करण्याचा आवाहन मा. नितीनआप्पा काळजे यांनी केले.
प्रचार रॅलीत भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते. नागरिकांनी येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांवर विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.




