Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकार कटिबद्ध

पिंपरी-चिंचवड : पवना आणि इंद्रायणी नदीला प्रदुषणाच्‍या विळख्यातून सोडवण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी जादाचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)  उभारणी करण्याबाबतचा आढावा राज्‍य शासनाच्‍या पर्यावरण विभागाकडून घेण्यात आला. त्याअनुषंगाने पर्यावरण विभागाच्‍या सचिवांच्‍या उपस्‍थितीत व्‍हीडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी सहभागी झाले होते. या वेळी तीनही कार्यालयाकडून प्रकल्‍पाबाबतची सद्यस्थिती ची माहिती घेण्यात आली.  पवना आणि इंद्रायणी नदी प्रदुषणाच्‍या विळख्यात सापडल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्‍य शासनाच्‍या पर्यावरण विभागाला जाग आल्याचे दिसत आहे. या संवाद बैठकीच्या बैठकीचे माध्यमातून पवना नदी काठावर उभारण्यात येत असलेले एसटीपी प्रकल्‍पाचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा –  राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट; पंतप्रधान मोदींचे गौरवाद्गार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या पर्यावरण विभागाकडून सध्या तीन ठिकाणी एसटीपी प्रकल्‍प उभारण्यात आले आहेत. त्‍याची ट्रायल रन घेण्यात येणार आहे. चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख या ठिकाणी हे प्रकल्‍प उभारले जाणार आहेत. तसेच उर्वरीत १०५ एमएलडीचे एसटीपी प्रकल्‍प ताथवडे, मामुर्डी, किवळे आदीसह विविध ठिकाणी हे प्रकल्‍प उभारले जाणार आहेत. त्‍याची माहिती महापालिकेच्‍या वतीने देण्यात  दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 पीएमआरडीए पवना नदीपात्रालगत १५ प्रकल्प उभारणार आहे. त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. त्याचा आढावा या बैठकीत मांडण्यात आला.

– अनिता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button