Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट; पंतप्रधान मोदींचे गौरवाद्गार

नागपूर : कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असते. आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही. कारण ही चेतना जागृत ठेवणारे अनेक आंदोलन भारतात होत राहिले आहे. भक्ती आंदोलन त्याचचं एक उदाहरण आहे. आमच्या संतानी समाजात ती चेतना निर्माण केली. महाराष्ट्रातील शेकडो संतांनी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी हे काम केलंय. तर पुढे विवेकानंद यांनी हे काम सुरू ठेवलं.

स्वातंत्र्यपूर्वी हेडगेवार (आणि गुरुजींनी  ही राष्ट्रीय चेतना वाढविली. शंभर वर्ष पूर्वीजे वटवृक्ष निर्माण झाले होते, ते आज विशाल स्वरूपात सर्वांसमोर आहे. आदर्श आणि सिद्धांत मुळे हे वटवृक्ष टिकले आहे. असे गौरवाद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपुरातील माधव नेत्रालयाचे भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमात बोलताना  पंत प्रधान मोदींनी संघ आणि स्वयंसेवकांच्या सेवा कार्याची स्तुती केली आहे.

हेही वाचा – रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकात वाहतूक बदल

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होत आहे. त्याला निरंतर गतिमान ठेवते. त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपण पाहतो, डोंगराळ क्षेत्र असो, सागरी क्षेत्र असो, वनक्षेत्र असो, संघाचे स्वयंसेवक त्यांचे काम करत असतात. प्रयागराजमध्ये आपण पाहिले स्वयंसेवकांनी कशा पद्धतीने लाखो लोकांची मदत केली. जिथे सेवा कार्य तिथे स्वंयसेवक. नैसर्गिक आपत्ती असो, किंवा इतर कुठलेही संकट असो, स्वंयसेवक अनुशासित सैनिकासारखं तिथे पोहोचतात आणि सेवा भावनेतून काम करतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button