झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणमार्फत एसआरए प्रकल्पाचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावे
पिंपरी-चिंचवड भाजप चिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी

पिंपरी-चिंचवड : निगडी येथील सेक्टर २२ मधील संग्रामनगर, सम्राटनगर येथील एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन सर्वेक्षण) खाजगी किंवा वैयक्तिक पातळीवर अधिकाऱ्यांच्यामार्फत न करता थेट झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत अधिकृतरित्या अर्थात बायोमेट्रिक सर्वेक्षण करून हा प्रोजेक्ट राबविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पिंपरी-चिंचवड शहर भाजप चिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिले आहे.
सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, विकासकांना हा प्रकल्प राबविण्यात यावा म्हणून एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांनी ही परवानगी दिली असून, त्या संदर्भात जाहीर हरकत घेण्यात आली होती. मात्र निवडणूक काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांनी निगडी येथील सेक्टर २२मधील संग्रामनगर, सम्राटनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना घरकुल योजना संदर्भात हरकत घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
हेही वाचा – ‘दंगलखोरांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्यासंदर्भात मुख्यमंत्री राज्यपाल पुणे विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांनी पुन्हा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. खाजगी विकासकांना बरोबर घेऊन निलेश गटणे यांनी आर्थिक तडजोड धोरण डोळ्यासमोर ठेवून पुन्हा झोपडपट्टी धारकांना वेठीस धरून प्रकल्प राबविण्यात आला. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून जाहीर आक्षेप घेण्यात आला असून, त्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत बायोमेट्रिक सर्वेक्षण करून बोगस नोंदणी झालेली आहे. त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी. आणि पुन्हा नव्याने एसआरए प्रकल्प राबविण्यात यावा मात्र यावेळी तो बायोमेट्रीक पद्धतीने राबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
झोपडपट्टी धारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन करसंकलन विभाग अधिकारी यांनी मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी जाहीर माफी करण्यात यावी. तसेच पाणी पुरवठा बिल माफी करण्यात यावी, जेणेकरून एसआरए प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही. ४० वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकी असल्याने झोपडपट्टी धारकांना मालमत्ता कर भरण्याची ऐपत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब दखल घेऊन एसआरए प्रकल्प अधिकारी निलेश गटणे यांना सेक्टर २२मधील सम्राटनगर, संग्रामनगर, येथील झोपडपट्टी धारकांची मालमत्ता कर थकबाकी पाणी पुरवठा कर थकबाकी माफी करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात आदेश देण्यात यावे, अशीही काळभोर यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.