Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शिवसेनेचे धोरण नेहमीच कामगारांच्या हिताचे’; इरफान सय्यद

मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

पिंपरी-चिंचवड : मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थांनी कामगारांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला केला आहे.सभासदसंख्या वाढ, ठेवी, स्वनिधी, गुंतवणूक आणि पारदर्शक कारभार हीच यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. शिवसेनेचे धोरण कायम कामगारवर्गाच्या हिताचे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाही माथाडी कामगार नेते इरफान सय्यद यांनी दिली.

आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था आणि रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडली.

रायरेश्वर पतसंस्थेचा ३२ वा अहवाल अध्यक्ष सतिश कंटाळे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1270 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती साधली आहे संस्थेचे वसूल भाग भांडवल 7 कोटी 45 लाख, ठेवी: 2 कोटी 5 लाख, कर्जवाटप: 12 कोटी 35 लाख, स्वनिधी निधी 2 कोटी 37 लाख, बँकेत गुंतवणूक: 3 कोटी 24 लाख, निव्वळ नफा: 1 कोटी 5 लाख इतका आहे.

हेही वाचा –  सच्चे भारतीय असाल, तर अशी विधाने करू नका! – सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची कानउघाडणी

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी रायरेश्वर माथाडी कामगार संस्थेचे श्रीकांत मोरे (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर घनवट (सचिव), रोहित नवले (खजिनदार), तसेच संचालक भिवाजी वाटेकर, शंकर निकम, विजय खंडागळे, सुभाष पुजारी, बाळू ओव्हाळ, संदीप चोरे, गुलाब शिंदे आदीं उपस्थित होते.

मातोश्री पतसंस्थेचा 28 वा अहवाल अध्यक्ष पांडुरंग कदम यांच्या अध्यक्षतेखाली सादर झाला. सदस्यसंख्या 1444 पर्यंत पोहोचलेली असून, संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती साधली आहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल: 9 कोटी 70 लाख, ठेवी: 2 कोटी 34 लाख, कर्जवाटप: 17 कोटी 96 लाख, स्वनिधी निधी 3 कोटी 53 लाख, बँकेत गुंतवणूक 2 कोटी 98 लाख, निव्वळ नफा 1 कोटी 32 लाख, इतका आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी
पांडुरंग कदम (अध्यक्ष) श्री बबन काळे (उपाध्यक्ष), उध्दव सरोदे (सचिव), सर्जेराव कचरे (खजिनदार), तसेच संचालक गोरक्ष दुबाले, बाबासाहेब पोते, अशोक साळुंके , विठ्ठल इंगळे , समर्थ नाईकवडे, ज्ञानदेव पाचपुते , चंद्रकांत पिंगट, आदींनी उपस्थिति लावली.

सभेच्या अध्यक्षस्थानी माथाडी कामगारांचे नेते इरफान सय्यद होते. प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे अध्यक्ष दिलीप देशमुखतसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी, सभासद कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव कचरे व अहवाल वाचन प्रकाश पवार व धर्मराज कदम यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button