Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्ये करून खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांनी सर्वधर्म समभावावर टीका करताना तो ‘नीचपणा’ आणि ‘नपुंसकपणा’ असल्याचे म्हटले. “सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरूष,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

संभाजी भिडे म्हणाले की, सर्वधर्म समभाव हा नीचपणा, नपुंसकपणा आहे. तसेच सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरूष आहे. तसेच यावेळी त्यांनी पुर्वी केलेले आंब्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला आहे. ते म्हणाले की, आंबे खावून मूलं होतं. मी आंब्याचं झाड लावलं आहे. तेथे जाऊन तुम्ही आंबे खाऊ शकता. त्याचबरोबर त्यांनी यावेळी म्हटलं की, खग्रास चंद्रग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते.

हेही वाचा    :      सच्चे भारतीय असाल, तर अशी विधाने करू नका! – सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींची कानउघाडणी

स्वातंत्र्य प्राप्तीवेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला होता. आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानले पाहिजे. मात्र, भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक राहिला आहे. त्यामुळे देव,देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करु, तिरंगा फडकवू. पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असं संभाजी भिडे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button