वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चिखली-पाटीलनगर येथील ट्रान्सफॉर्मरचे स्थलांतर!
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

चिखली- पाटीलनगर रस्ता विना अडथळा; नागरिकांना दिलासा
पिंपरी- चिंचवड : देहू- आळंदी रस्त्यावर चिखली-पाटील नगर येथील अत्यंत रहदारीच्या ठिकाणी महावितरण प्रशासनाचा जुना ट्रान्सफॉर्मर होता. त्यामुळे रस्त्यात अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडीची समस्या नियमित भेडसावत होती. याची दखल घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महावितरणकडे ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार, प्रशासनाने आज ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्याची कार्यवाही केली.
भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली- पाटीलनगर येथे देहू- आळंदी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण प्रशासनाचा ट्रान्सफॉर्मर हटवण्याबाबत स्थानिक नागरिक, ग्रामस्थ यांनी मागणी केली होती.
हेही वाचा – लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकडे यांच्याकडून माहिती
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर पाटील नगर येथील ट्रांसफार्मर स्थलांतरीत केला आहे. यावेळी माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्यासह महापालिका व महावितरणचे संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
देहू आळंदी रस्त्यावरील पाटीलनगर हा भाग अतिशय रहदारीचा आहे. या भागातच अनेक लघुउद्योग आहेत कामगारांची सातत्याने या रस्त्यावरून ये जा असते. पाटील नगरच्या ट्रांसफार्मरमुळे देहू आळंदी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत होती. हा रस्ता विना अडथळा वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावा नागरिकांची गैरसोयी दूर व्हावी यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने महावितरण कडे पाठपुरावा केला ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याबाबत सूचना करत ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची मागणी पूर्ण केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
चिखली आणि परिसरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका विकास आराखड्यातील 7 डीपी रस्त्यांच्या कामांना आपण यापूर्वीच सुरूवात केली आहे. शहरातील ‘‘ 42 मिसिंग लिंक’’चाही प्रश्न काही दिवसांत मार्गी लागणार आहे. सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. चिखली- पाटीलनगर परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणारा ट्रान्सफॉर्मर हटवण्याची मागणी होती. त्यानुसार कार्यवाही केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोंडीमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी आम्ही आग्रही आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.