Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘धुरंधर २’ ओटीटीवर येण्यास सज्ज; ‘या’ तारखेला घरबसल्या पाहता येणार चित्रपट

Dhurandhar 2 OTT Release: ओटीटी असे माध्यम आहे, ज्यावर घरबसल्या जगातील कुठलाही चित्रपट, विविध वेब सीरिज, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म, रिअॅलिटी शो, विविध खेळाचे सामने ओटीटीवर पाहता येतात. आपले आवडते सिनेमे आपण पुन्हा पुन्हा ओटीटीवर पाहू शकतो. त्यामुळेच थिएटरमध्ये जरी चित्रपट पाहिले तरी ते सिनेमे ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार,ओटीटीच्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

गेल्या काही दिवसांपासून धुरंधर २ हा सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार, याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला फक्त भारतातूनच नाही तर, जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमाने जगभरात एक हजार कोटींहून जास्त कमाई केली होती. हा सिनेमा थिएटरनंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ओटीटीवरदेखील सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

धुरंधर जेव्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता, तेव्हाच निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणेत धुरंधर २ हा सिनेमा १९ मार्चला प्रदर्शित झाला. धुरंधर २ नेदेखील मोठ्या प्रमाणात कमाई केली. सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाने भारतात ११४४ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात १७९६ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा –  यंदा केरळमध्ये २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, निर्मात्यांनी नेमकी तारीख घोषित केली नव्हती. त्यामुळे तारखांबाबत प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, धुरंधर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असला तरी धुरंधर २ जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच, हा सिनेमा कधी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार, याची तारीख समोर आली आहे.

धुरंधर २ हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर ४ जून २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच, हा सिनेमा हिंदीसह पाच भाषांमध्ये पाहता येणार आहे. यामध्ये तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांचा समावेश आहे. ४ जूनला हा सिनेमा संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. निर्मात्यांनी या अधिकृत घोषणा केली नसली तरी जिओ हॉटस्टारवर चित्रपट ४ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे.

धुरंधर २’ चा रनटाइम देखील त्याच्या थिएटरमधील रनटाइमपेक्षा जास्त असेल. चित्रपटाचा थिएटरमधील रनटाइम ३ तास ​​४९ मिनिटे होता, तर ओटीटी रनटाइम वाढवून ३ तास ​​५२ मिनिटे करण्यात आला आहे. सिनेमा तीन मिनिटे जास्त ओटीटीवर पाहता येणार आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंह, आर.माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, अक्षय खन्ना, संजय दत्त असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसले. या सर्वच कलाकारांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button