Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

महिला बचत गटामार्फत चालवला जातोय प्रकल्प

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात घरगुती कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दापोडी येथे शून्य कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, सीवायडीए सामाजिक संस्थेचे संस्थापक मॅथ्यू मॅथम, कार्यकारी संचालक प्रवीण जाधव, अकर सोल्युशन्सचे उपाध्यक्ष दिलीप गाडा आदी उपस्थित होते.

आयुक्त सिंह यांनी यावेळी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करण्यात येत आहे, याबाबत माहिती घेतली. प्रकल्पस्थळी कार्यरत बचतगटांच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या कामाची प्रशंसा केली. यावेळी ते म्हणाले, दापोडी परिसरात सुरु असलेला शून्य कचरा प्रकल्प हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. घरगुती कचऱ्याचे संकलन केल्यानंतर तो वर्गीकृत करून त्याद्वारे खत निर्मिती करण्याची प्रक्रिया करण्याचे काम करणाऱ्या महिलांची आरोग्याची काळजी येथे व्यवस्थित घेतली जात आहे. या महिलांना आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही आयुक्त सिंह म्हणाले.

हेही वाचा   :    आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

शून्य कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यावरही भर देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले. उपायुक्त सचिन पवार यांनी आयुक्त सिंह यांना शून्य कचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.

असा आहे प्रकल्प

पिंपरी चिंचवड महापालिकेने सीवायडीए संस्था आणि अकर सोल्युशन यांच्य सहकार्याने दापोडी येथील आनंदवन व काटेवस्ती येथे शून्य कचरा प्रकल्प सुरू केला आहे. वैष्णवी महिला बचत गटाच्या माध्यमातून हा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पांसाठी दररोज ४२८ घरातील कचऱ्याचे संकलन करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्यात येते. त्यानंतर धूळ झटकण्याची मशीन, ॲग्लोमीटर मशीन, हायड्रॉलिक प्रेस मशीन, सेमी ऑटोमॅटिक खत मशीन आदीच्या मदतीने कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे खत निर्मिती करण्यात येते.

दापोडी परिसरात सुरु असलेला शून्य कचरा प्रकल्प हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवड शहरासाठी येत्या काळात असे विविध प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका.

दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प हा महिला बचतगटामार्फत चालवण्यात येतो. बचतगटाच्या महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टिने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे. सीएसआरच्या मदतीतून हा प्रकल्प महापालिकेने उभारला आहे.

– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button