Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…त्या १७ कर्मचा-यांना त्वरीत कामावर घ्या, सहायक आयुक्तांचे ठेकेदाराला आदेश

पिंपरी : शहरातील विविध स्मशानभूमी येथे देखभाल व सुरक्षेचे काम करणाया सर्व कर्मचा-यांना तत्काळ कामावर रुजू करुन घेण्याचे न्यायालयाने पालिकेला आदेश दिले. तरी, ठेकेदाराकडून १७ कर्मचा-यांना परत कामावर घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांच्या मध्यस्तीनंतर आरोग्य विभागातील प्रशासनाने त्वरीत आदेश काढून त्या सतरा कर्मचा-यांना कामावर रुजू करुन घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत शहरातील विविध स्मशानभूमीची देखभाल आणि तेथील सुरक्षा ठेवण्याचे काम काही कंत्राटदार संस्थांना देण्यात आले आहे. काही कारणास्तव तेथे काम करणा-या काही कर्मचा-यांना संबंधित संस्थांनी कामावरुन अचानक कमी केले.

हेही वाचा –  पुण्यातील सांडपाणी थेट नद्यांत! प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिकेवर कारवाईचे पाऊल

संस्थेकडून अन्याय झाल्याने सर्व कार्मचा-यांनी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यावर या सर्व कर्मचा-यांना त्वरीत कामावर घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तरी देखील संबंधित ठेकेदारांकडून कर्मचा-यांना कामावर रुजू करुन घेण्यास विरोध केला जातो. अनेकवेळा दाद मागूनही न्याय मिळत नसल्यामुळे कार्मचा-यांनी मनसेकडे दाद मागितली.

मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांनी त्या कर्मचा-यांसह आरोग्य विभागात जाऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावर सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी त्वरीत आदेश काढत संबंधित १७ कर्मचा-यांना कामावर तत्काळ रुजू करुन घेण्यात यावे, अशा सूचना संबंधित ठिकेदाराला दिल्या. अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देखील त्यांनी दिली. त्यामुळे पटेकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने सर्व कर्मचा-यांमध्ये आनंदी वातावरण आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button