Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जादा परताव्याचा आमिषाने थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी १२ लाखांची फसवणूक

पिंपरी : उच्चपदस्थ अधिकारी म्हणून खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली. ही घटना थेरगाव येथे १ ऑक्टोबर २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडली.

थेरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी (दि. १४) याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्हेन्टारस कंपनीमधून वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून बोलणाऱ्या व्यक्ती, अकाउंट व्यवस्थापक अबु बाकर, रोहन अग्रवाल, सपोर्ट ग्रुप जोसेफ, ईरिका व्ही नावाने बोलाणारे संशयित तसेच वेगवेगळ्य बँकेचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा –  ‘डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी मिशन यामुळे संशोधनासाठी पोषक वातावरण’; संगणक तज्ञ अतुल कहाते

फिर्यादी हे एका खासगी कंपनीतून उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. संशयितांनी फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून व्हेन्टारस कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या व्हेन्टारस कंपनीमार्फत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर खात्रीशीर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या व्हेन्टारस कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यास व त्यावर फॉरेक्स ट्रेडिंगकरता नमूद बँक खात्यांवर एकूण एक कोटी ३० हजार २३ लाख ५१५ रुपये भरण्यास भाग पाडले. त्यामधील २१ लाख ९१ हजार १३५ रुपये यूसडीटीमार्फत परत दिले. परंतु दिलेल्या रकमेतील चार लाख ६४ हजार रुपयांचे लिन लागल्याने त्यांनी उर्वरित रकम एक कोटी आठ लाख ३२ हजार ३८० रुपये व लिन रक्कम चार लाख ६४ हजार रुपये असे एकूण एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची फसवणूक केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button