Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील २५ ते ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट; १५ जूनपर्यंत मेघगर्जनेचा अंदाज

Monsoon Update : राज्यातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु, अद्यापही काही जिल्ह्यांना मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 25 ते 30 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दक्षिण कोकणासह राज्यात काही भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –  “सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात. मात्र,…”; भुजबळांचा रोख कोणाकडे? पुन्हा सूचक वक्तव्य

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जोरदार पाऊसाचा अंदाज आहे. राजापूर, वैभववाडी, रामेश्वर, चिपळून,सांगली, मिरज, शिराळा, हातकणंगले, जेरूर, कळंब, लातूर, पूर्णा, धारूर, अहमदपूर या भागात पावसाने हजेरी लावली.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button