Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कुदळवाडी अतिक्रमण कारवाई : पोलिसांवर दगडफेक प्रकरणात ३३ जणांना अटक । (दंगेखोरांची यादी वाचा)

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका :  दंगेखोरांची शोधमोहीम जोरात, ३ अल्पवयीन ताब्यात

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी ।

कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील महापालिकेच्या निष्कासन कारवाईदरम्यान झालेल्या दगडफेक, शासकीय कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेच्या नुकसानीप्रकरणी चिखली पोलिसांनी आतापर्यंत ३३ जणांना अटक केली असून तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात 300 ते 500 अनोळखी व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), १२६(२), १३२, १८९(१), १८९(२), १८९(३), १९०, ३२४(३) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास किंग वजन काट्यासमोर, नायरा पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कुदळवाडी परिसरातील अनधिकृत मंदिर, मशिदी व इतर धार्मिक स्थळांवर निष्कासन कारवाई सुरू असताना मोठा जमाव तेथे जमा झाला. या जमावाने पोलिस व शासकीय कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे.

या दगडफेकीत फिर्यादी राम गोमारे, यांनी दिलेल्या तक्रारी वरून अटक आरोपींकडून सखोल चौकशी करून या प्रकरणातील इतर फरार आरोपींची नावे व पत्ते निष्पन्न करणे, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेणे, दंगलीदरम्यान वापरलेली वाहने आणि संभाव्य शस्त्रे जप्त करणे तसेच गुन्ह्यामागील हेतू आणि कटाचा तपास करणे आवश्यक आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालयात पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या मागणीवर न्यायालयात सुनावणी होणार असून पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

अटक आरोपींची यादी (वयासह)

१) नाजीम नईम चौधरी (वय २६ वर्षे), २) इजाज वकार चौधरी (वय २६ वर्षे), ३) मोहम्मद उस्मान हुसेन इद्रीसी (वय २६ वर्षे), ४) अब्दूल रहमान सरवरअली इद्रीसी (वय २८ वर्षे), ५) आजम फकरुध्दीन रज्जाक (वय १९ वर्षे), ६) मोहम्मद आसीफ हबीबुर रहेमान इद्रीसी (वय १८ वर्षे), ७) नसरुद्दीन अब्दुल हमीद सिद्दीकी (वय २० वर्षे), ८) रफीक शकील शेख (वय ३५ वर्षे), ९) शाहीआलम अफजल सिद्दीकी (वय २४ वर्षे), १०) साहिल अन्सारी शेख (वय ३० वर्षे), ११) गुलामहुसैन मैनुल्लाह खान (वय १९ वर्षे), १२) निजाम हुसेन नायाब हुसेन सिद्दीकी (वय २२ वर्षे), १३) अब्दूल करीम अलीममुल्ला चौधरी (वय ३५ वर्षे), १४) रामदेव परमात्माप्रताप पांडे (वय ४८ वर्षे), १५) फैजन नियाज चौधरी (वय २६ वर्षे), १६) युसुफ खुर्शीदआलम चौधरी (वय २२ वर्षे), १७) अकदस बरकतअली खान (वय १८ वर्षे), १८) अबु सोफीया चौधरी (वय ३२ वर्षे), १९) नसिम अहमद इद्रीसी (वय १९ वर्षे), २०) मोहम्मदनवाज मोहम्मदअली खान (वय ३४ वर्षे), २१) कयामुध्दीन सिराजउध्दीन चौधरी (वय २२ वर्षे), २२) मोहम्मदकासिम मेहफुजअलम चौधरी (वय २४ वर्षे), २३) फय्यज फत्तेह खान (वय २८ वर्षे), २४) मकसूद मंजूर चौधरी (वय २१ वर्षे), २५) मेहफुज मंजूर चौधरी (वय २६ वर्षे), २६) आकाश रामविलास सूर्यवंशी (वय २१ वर्षे), २७) जुनेद मजीद बेग (वय २० वर्षे), २८) मुराद मजीद बेग (वय ३४ वर्षे), २९) आरिफ वासउली इद्रीसी (वय ३८ वर्षे), ३०) अभिनंदन निरजकुमार यादव (वय १८ वर्षे), ३१) इलियास बासु तांबोळी (वय ४४ वर्षे), ३२) शादाब नौशाद मोमीन (वय ३३ वर्षे), ३३) शादाब मोहम्मद सय्यद (वय ३१ वर्षे).

आकडेवारी पुढीलप्रमाणे :

एकूण अटक आरोपी : ३३

विधीसंघर्षित बालके :

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button