पुण्यात भरचौकात तरुणाचे अश्लील चाळे; वडिलांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, काय म्हणाले वाचा !

पुणे : सध्या पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतच चाललेला आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चाललेला आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुण्यात टॅक्सीने प्रवास करणाऱ्या महिलेला अशाच प्रकाराचा अनुभव आला. मात्र, महिलेने थेट पोलिस ठाणे गाठल्याने पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला आहे.
आज सकाळी महिला दिनी पुण्यात एक अत्यंत घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाय का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने महिलांना अश्लिल चाळे केले आहेत. तसेच या तरुणाने चौकात सिंग्लनला गाडी थांबवत लघू शंका देखील केली आहे. या अत्यंत घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकाता ही घटना घडली आहे. महिलांच्या समोर संबंधिताने अश्लील चाळे केले. BMW या महागड्या गाडीत मद्यधुंद अवस्थेत हा तरुण होता. त्यासोबत गाडीत त्याचे इतर दोन मित्र्यांनीही मद्याचे प्राशन केले होते. महिलांना अश्लील चाळे करून ही गाडी आणि त्यातील तरुण वेगाने वाघोलीच्या दिशेने निघून गेले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या BMW महागड्या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.
हेही वाचा – ‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी ‘विशेष समिती’ राबवा’; आमदार हेमंत रासने यांची मागणी
गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.
या घृणास्पद प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरला आहे का असा प्रश्न या प्रकारामुळे विचारण्यात येत आहे.