ताज्या घडामोडीराष्ट्रिय

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्यां विरोधात कठोर भूमिका

अमेरिकेतून बाहेर काढलेले लोक C-17 ने आज भारतात परतणार

राष्ट्रीय : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्या 205 भारतीयांना देशाबाहेर काढलय. यात 104 लोकांची ओळख पटली आहे. या सगळ्या लोकांना C-17 या अमेरिकी सैन्य विमानाने भारतात पाठवण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी पंजाबच्या अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर C-17 लँड करेल. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितलं की, अमेरिकेतून पाठवलेल्या या अवैध प्रवाशांना राज्य सरकारचे लोक रिसीव करतील. ओळख आणि अन्य कागदपत्रांसंदर्भात विमान तळावर काऊंटर बनवण्यात आले आहेत.

अमृतसर प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, अमेरिकी विमानाने येणाऱ्या सर्व लोकांच्या कागदपत्रांची अमृतसर विमातळावर तपासणी करण्यात येईल. इमीग्रेशनशिवाय गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाईल. गुन्हेगारी रेकॉर्ड आढळला, तर विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल. या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो. सूत्रांनुसार अमेरिकेतून डिपोर्ट होणाऱ्या या भारतीयांमध्ये काही असे लोक सुद्धा असू शकतात, जे भारतात गुन्हा करुन अमेरिकेत पळून गेलेले असतील.

हेही वाचा  :  स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती 

अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले किती जण?

अमेरिकेतून पाठवण्यात आलेल्या या भारतीयांना घेऊन अमेरिकेच सैन्य विमान दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अमृतसर इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड होईल. या विमानात 200 पेक्षा जास्त भारतीय असल्याची पृष्टी करण्यात आली आहे. यात 104 लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. Gujrat-33, Punjab-30, UP-03, Haryana-33,Chandigarh-02, Maharashtra- 03 लोक आहेत. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेत बेकायदरित्या राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात घेऊन येणारं हे पहिलं विमान आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार असे जवळपास 18 हजार भारतीय आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button