Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ! यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्माला ‘नाडा’ची नोटीस

Yashasvi Jaiswal and Shafali Verma | आयपीएल २०२६ चा थरार रंगात आलेला असतानाच भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज शफाली वर्मा या दोघांना राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) नोटीस बजावली आहे. डोप चाचणीसाठी दिलेल्या ठिकाणी अनुपलब्ध राहिल्याने (Whereabouts failure) ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

यशस्वी आणि शफाली हे दोघेही ‘नाडा’च्या नोंदणीकृत चाचणी गटात (RTP) समाविष्ट आहेत. या नियमानुसार, खेळाडूंना त्यांच्या वास्तव्याची आणि सरावाची ठिकाणे तसेच वेळेची माहिती आगाऊ देणे बंधनकारक असते, जेणेकरून अधिकारी कधीही येऊन त्यांची नमुने चाचणी घेऊ शकतील. रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शफाली आणि डिसेंबरमध्ये यशस्वी त्यांनी दिलेल्या ठिकाणी उपस्थित नव्हते. यामुळे त्यांच्या नावावर पहिली ‘मिस्ड टेस्ट’ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे महिनाभर बंद

नियम आणि संभाव्य कारवाई

‘नाडा’च्या नियमांनुसार, एक चाचणी चुकवणे हा थेट गुन्हा मानला जात नाही. मात्र, १२ महिन्यांच्या कालावधीत जर एखाद्या खेळाडूने सलग तीन वेळा अशा प्रकारे चाचणी चुकवली, तर तो डोपिंगविरोधी नियमांचा भंग मानला जातो. अशा परिस्थितीत खेळाडूवर दोन वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. नाडाने फेब्रुवारी महिन्यात या दोघांकडून स्पष्टीकरण मागवले होते, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

महत्त्वाच्या स्पर्धांवर सावट?

ही नोटीस अशा वेळी आली आहे जेव्हा दोन्ही खेळाडू अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. यशस्वी जैस्वाल सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असून त्याचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे, शफाली वर्मा १२ जूनपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागली आहे.

या प्रकरणामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि हे खेळाडू काय भूमिका घेतात, याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. ‘व्हेयरअबाउट क्लॉज’चे उल्लंघन करणे या खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button