Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“आपल्या मातीतून प्रेरणा घेऊन, स्थानिक तरुणांसाठी संधी निर्माण करणारा एक यशस्वी उद्योजक”

शिक्षण विश्व: श्री. विनायक पंढरीनाथ भोंगाळे यांची प्रेरणादायी वाटचाल

पुणे | सुमारे ४८ ते ५० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जळगांव (जामोद) येथून शिक्षण घेणाऱ्या श्री. विनायक पंढरीनाथ भोंगाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली वाटचाल सुरू केली. १९८९ साली त्यांनी श्री. गणेशराव पाटील यांच्याकडे केवळ ₹७०० पगारावर शेतीमध्ये सालगडी म्हणून काम सुरू केले होते.

आज ते बांधकाम व्यवसायातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन, एम.बी.ए. न करता प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून यशाचा मार्ग दाखवला आहे. पुस्तकांबरोबरच व्यवहारज्ञान, चिकाटी आणि जमिनीशी असलेली नाळ यामुळे त्यांनी यशाचे शिखर गाठले.

“कमवा व शिका” उपक्रमातून नव्या पिढीसाठी दिशा

आपल्या मातीत आणि गावाशी असलेल्या नात्याची जाणीव ठेवून त्यांनी “कमवा व शिका” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ रोजगारपुरता मर्यादित नसून, स्थानिक तरुणांना व्यवसायिक अनुभव देत उद्योजकतेचा पाया घालणे हा त्यामागचा उद्देश आहे.

हेही वाचा    :      शिक्षण विश्व: व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना 

विशेष कॅम्पस इंटरव्ह्यू — २८ जून २०२५

या उपक्रमाअंतर्गत विशेष कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात येत आहे, ज्यामध्ये तरुणांना प्रत्यक्ष काम करत शिकण्याची संधी मिळणार आहे. हा उपक्रम एक प्रकारे अनुभवांची शाळा ठरणार आहे.

दिनांक : २८ जून २०२५

स्थळ : श्रीमती तुलसीबाई रंगलालजी जाम्बड़ विद्यानिकेतन आणि सीनियर कॉलेज, नांदुरा

नोंदणीसाठी ई-मेल : [email protected]

संकेतस्थळ : www.yogeshenterprises.in

पात्रता:

  • १०वी / १२वी उत्तीर्ण किंवा शाळा सोडलेले
  • पदवी अभ्यासक्रमात असलेले किंवा नुकतेच पदवीधर झालेले विद्यार्थी
  • फ्रेशर्स व उत्साही युवक
  • योगेश एंटरप्रायझेस तर्फे उपलब्ध संधी व सुविधा:
  • निवास व राहण्याची सोय
  • “कमवा आणि शिका” कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव
  • निश्चित व कार्यक्षमतेवर आधारित पगार
  • आकर्षक पगार संरचना

“ही केवळ नोकरी नाही, तर यशस्वी भविष्याची सुरुवात आहे!” स्थानिक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा व त्वरित नोंदणी करावी. जो यशस्वीपणे मार्ग चालून गेला आहे, त्याच्याकडून यश शिकण्याची ही सुवर्णसंधी आहे. नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा अधिक माहितीसाठी संपर्क: [email protected], www.yogeshenterprises.in साधवा असे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button