Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

शिक्षण विश्व: व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाची स्थापना

पालक-शिक्षक संघात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत प्रत्येक वर्गातील पालक आणि शिक्षकांचा समावेश

पिंपरी | 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी व्ही.के. माटे हायस्कूल, चिंचवड येथे पालक-शिक्षक संघाची (PTA) स्थापना उत्साहात करण्यात आली. प्रारंभी शाळेचा एसएससी बोर्डाचा निकाल 100% लागल्याबद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन करण्यात आले.

पालक-शिक्षक संघात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत प्रत्येक वर्गातील पालक आणि शिक्षकांचा समावेश आहे. संघाच्या अध्यक्षपदी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह व प्राचार्या मान. सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. विशाल कांबळे यांची पालकांमधून सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून उपशिक्षिका सौ. अनिता बोरसे यांची, व उपसचिव म्हणून पालकांमधून सौ. प्राजक्ता भंडारे यांची निवड झाली.

हेही वाचा     :      शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांना मिळाली करिअरची दिशा!

सभेमध्ये प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांनी पालक-शिक्षक संघाचे कार्य, उद्दिष्टे आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत “संवर्धन वर्ष” म्हणून साजऱ्या होणाऱ्या वर्षातील उपक्रमांची माहिती दिली.

या प्रसंगी उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत आणि शिक्षक समन्वयक श्री. संजय खेडकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन सौ. अनिता बोरसे मॅडम यांनी केले.

शाळा, शिक्षक, पालक आणि संस्था यांच्यातील समन्वय अधिक मजबूत व्हावा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने पालक-शिक्षक संघ कार्यरत राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button