Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनैतिक संबंधातून दुहेरी खून

तळवडे येथील घटनेने खळबळ,आरोपी एका तासात अटकत

पिंपरी चिंचवड : तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे अमरजित जेधे यांची बांधकाम साईट असलेल्या मोकळ्या जागेत दोघांचे अर्धनग्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अनैतिक संबंधातून ही दुहेरी हत्या झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी स्पष्ट केले.

मंगला सुरज टेंभरे (३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलीक सरोदे (५५, रा. अकोला) या दोघांचे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडले. या प्रकरणी आरोपी दत्तात्रय लक्ष्मण सावळे (४९, रा. चिखली) याला केवळ एका तासात पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांना डायल 112 वरून रात्री तीनच्या सुमारास सूचना मिळताच देहूरोडचे रात्रगस्त अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मयत मंगला टेंभरे हिचा पती सुरज टेंभरे याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी व सरोदे हे रात्री दारू पित बसले होते. रात्री दोनच्या सुमारास ठेकेदार सावळे यानेच त्याला माहिती दिली की दोघे अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर दोघांचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा –  ‘आज तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता’, आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विधान

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे व बाळासाहेब कोपनर यांनी घटनास्थळी भेट दिली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी सावळे मुळगावी पळून जात असल्याचे समजताच देहूरोड पोलिसांच्या पथकाने त्याला चिखलीतून एका तासात अटक केली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि डीसीपी संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे आणि त्यांच्या पथकाने ही तपासातली उल्लेखनीय कामगिरी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button