Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महावितरणची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा!

भाजपा आमदार महेश लांडगे यांची संचालकांना मागणी

शाखा विभाजन, उच्चदाब उपकेंद्र उभारण्याचा प्रश्न मार्गी लागणार

पिंपरी-चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघातील महावितरण वीज पुरवठा सेवा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने प्रस्तावित विकासकामे, शाखा विभाजन, उपकेंद्र उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महावितरण संदर्भात विविध प्रलंबित विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे संचालक विश्वास पाठक यांच्यासोबत मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विद्युत विषयक कामांचा आढावा आमदार महेश लांडगे यांनी घेतला.

भोसरी मतदारसंघांमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपकेंद्रांची मागणी करण्यात येत आहे. हे उपकेंद्र उभारले जावेत यासाठी आज सूचना केल्या आहेत. मान्सूनपूर्वक कामांमध्ये विद्युत विषय कामांना प्राधान्य दिले जावे. जेणेकरून पावसाळ्यात पुढील चार महिने नागरिकांकडून वीज पुरवठा खंडित होण्याबाबत तक्रारी येऊ नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना देखील करण्यात आली आहे.

सक्षमपणे बीज पुरवठा करण्याबाबत आवश्यक उपाययोजना आणि प्रस्तावित कामांना गती देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. याबाबत त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याबाबत निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना संचालकांनी दिले आहेत.

हेही वाचा –  “मंत्री करायचं की नाही, हे राष्ट्रवादी ठरवणार”; छगन भुजबळ

बैठकीमधील महत्त्वाचे मुद्दे :

भोसरी मतदारसंघांमध्ये औद्योगिक तसेच घरगुती व्यावसायिक व इतर ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी उपकेंद्रांची उभारणी करण्यात यावी. चऱ्होली व मोशी शाखा विभाजन, मोशी सफारी पार्क येथील उच्चदाब वाहिनीसाठी उपकेंद्रसाठी जागेची उपलब्धता करणे, प्राइड वर्ल्ड सिटी येथील अति उच्चदाब उपकेंद्र जागा उपलब्धता, सेंचुरी ऐन्का येथे अतिरिक्त दोन रोहित्र उभारणे. मतदारसंघातील 22 KV रोहित्रांचे रूपांतर 11 KV रोहित्रांमध्ये करणे., आरडीएसएस योजनेतील प्रस्तावित कामे मार्गी लावणे. 353.94 कोटी रुपयांच्या डीपीआरला मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करणे, औद्योगिक क्षेत्रातील वीज समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे, अशा महत्वपूर्ण मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

भोसरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विद्युत विषयक प्रलंबित कामांचा आढावा बैठकीत घेतला. प्राधान्याने मान्सूनपूर्व कामांना गती द्यावी. पावसाळ्यामध्ये खंडित वीज पुरवठ्याचा सामना नागरिकांना करावा लागू नये या दृष्टीने उपाययोजना करण्याचेही सूचित केले. शाखा विभाजन, उच्च दाब वीज उपकेंद्र, मनुष्यबळ निर्मिती हे विषय मार्गी लागल्यास वीज पुरवठा सक्षम करण्यास मदत होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.

– महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button