‘काँग्रेसने कुरघोडी केल्यास आम्हीही करू’; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar : महाविकास आघाडीचे काँग्रेस हा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला जर सन्मानाने वागणूक दिली. तर महाविकास आघाडी कायम राहू शकते. मात्र मोठ्या भावाने मानसन्मान न देता, कुरघोडी केल्यास आम्हीदेखील कुरघोडी करण्यास सज्ज आहोत.
आता बऱ्याच कालावधीनंतर रोहित पवार कोण आहेत हे माहीत झाले असेल, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून रोहित पवार सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये हे सर्वांना दाखवून देऊ. असा टोला नाव न घेता रोहित पवार यांनी महाविकास आघाडी अंतर्गत नेतेमंडळींना लगावला आहे.
सोलापूर येथे रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले, ही निवडणूक आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहेत. मात्र, यात जागावाटप करताना एकमेकांचा मान-सन्मान राखायला हवा. यासाठी तिन्ही घटक पक्षांना आता नव्याने बांधणी करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – महावितरणची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा!
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले होते. यानंतर नव्या सरकारमध्ये सुरुवातीला काही महिने छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. मंत्रिपदापासून डावलल्यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. असे असताना भुजबळ यांना विनापद मोकळे ठेवणे महायुतीमध्ये कुणालाही परवडणारे नव्हते. त्यामुळेच त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद बहाल केल्याचे दिसत आहे, असा दावाही त्यांनी केला.
रोहित पवारांना माहिती आहे की, आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचंच नाही. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्करताहेत. काका आधीच दुसरीकडे गेले आहेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेल्या आहेत. येणारे राजकारण वेगळ्या धाटणीचे तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतं भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील’, असे मोठे भाकित शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले.