आयआयबी महाफास्ट परीक्षा येत्या रविवारी होणार
२५०० विद्यार्थ्यांना अंशत किंवा संपूर्ण फी माफ होणार

पिंपरी : दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाफास्ट परिक्षेचे आयोजन येत्या १९ जानेवारी (रविवार) रोजी संपूर्ण राज्यभरात केले आहे. यावर्षीच्या आयआयबी महाफास्ट परिक्षेव्दारे दहावीतून अकरावीत जाणाऱ्या गुणवत्ताधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल तब्बल २ हजार ५०० विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे, अंशतः किंवा संपूर्णतः फीस माफ करण्याची मोठी घोषणा आयआयबीने केली आहे.
महाराष्ट्राच्या कोचिंग क्षेत्रात सर्वप्रथम शिष्यवृत्तीची मूहूर्तमेढ रोवणारा तसेच आतापर्यंत हजारो होतकरू, गुणवंत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्याथ्यांच्या जीवनातील आधारस्तंभ ठरलेला, महाराष्ट्रासह भारताच्या नकाशावर शिक्षणक्षेत्रात गुणवत्तेचा अमिट ठसा उमटवणारा महाराष्ट्राचा महाबॅण्ड आयआयबी ने आपल्या प्रदिर्घ वाटचालीत गुणवत्ता आणि विश्वासहर्ता जपत आपली घौडदौड कायम ठेवली आहे. त्याला अनुसरून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी व त्यांना राष्ट्रीयस्तरावरील नीट व जेईईच्या स्पर्धेकरीता सज्ज करण्यासाठी आणि त्यांच्यातील स्पर्धात्मक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि गुणवंतांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयबीच्या वतीने महाफास्ट २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
परिक्षेच्या नाव नोंदणीसाठी www. libedu.com या संकेतस्थळावर किंवा ७३०४७३०७३०, ७३०४५६७५६७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयआयबी महाफास्ट परिक्षा
रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी आयआयबी महाफास्ट परीक्षा होत आहे. परीक्षा वेळ नोंदणीकृत विद्याथ्यर्थ्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात येईल. परीक्षा केंद् नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे- शहर, पुणे-पिंपरी, कोल्हापूर, अकोला येथे आहे .या सर्व शाखांवर नोंदणी करता येईल.विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे.
सीबीएसई व स्टेट बोर्ड साठी स्वतंत्र पेपर तर मराठी माध्यमासाठी मराठी भाषेत पेपर इ.१० वी विज्ञान व गणित यावर आधारीत असून परीक्षेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ असणार आहे तर परीक्षा पध्दत पेन व पेपर (ऑफलाईन) मोडवर होणार आणि (-१) निगेटिव्ह माकींग गुण दान पध्दती आकारण्यात येणार असल्याची माहीती आयआयआबीच्या वतीने कळविण्यात आली आहे.