ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतींची निवडणूक संपन्न

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध समितींच्या सभापतीपदाची निवडणूक आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे संपन्न झाली. यामध्ये विधी समिती सभापतीपदी सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापतीपदी संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदी कैलास कुटे आणि शिक्षण समिती सभापतीपदी रविना आंगोळकर यांची निवड झाली आहे.

महापालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापती पदी निवड करण्यासाठी आज त्या त्या समितीची विशेष सभा पार पडली. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कामकाज पाहिले. नवनिर्वाचित सभापतींना पिठासीन अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित होते. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा        :                  महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

तर, विधी समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप, कुंदा भिसे, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, महिला व बालकल्याण समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य पल्लवी जगताप, निता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, सुप्रिया चांदगुडे, निकिता कदम, सारिका मासूळकर, शहर सुधारणा समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य अर्चना सस्ते, कुणाल वाव्हळकर, उत्तमराव केंदळे, अनंत कोऱ्हाळे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, योगेश लांडगे, जितेंद्र ननवरे आणि शिक्षण समितीच्या विशेष सभेला समितीचे सदस्य पल्लवी वाल्हेकर, कविता भोंगाळे, रिटा सानप, सारिका बोऱ्हाडे, प्रियांका कुदळे, योगिता बारणे उपस्थित होते.

विशेष समितींच्या सभांचे वार पुढीलप्रमाणे :

  • विधी समिती – १ व ३ रा शुक्रवार, दुपारी ३ वाजता
  • महिला व बालकल्याण समिती – २ व ४ था गुरुवार, दुपारी २.३० वाजता
  • शहर सुधारणा समिती – २ व ४ था मंगळवार, दुपारी २ वाजता
  • क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती – २ व ४ था शुक्रवार, दुपारी २.३० वाजता
  • शिक्षण समिती – १ व ३ रा गुरुवार, दुपारी २.३० वाजता

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button