पिंपरी / चिंचवड

माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी : राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, अनेक ठिकाणी नगरसेवक पदी उमेदवार म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता व धाकधूक निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत-चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका तसेच आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री श्रीमती. अनुराधाताई गोरखे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपा आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून, याच क्षणापासून प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक प्रचाराची औपचारिक सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा – बोगस बियाणे! अखेर सरकारला आली जाग, आमदारांची समिती ठरविणार नियंत्रण प्रणाली

यावेळी बोलताना अनुराधाताई गोरखे म्हणाल्या की, “प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षा तसेच नागरी सोयी-सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

तसेच, “नगरसेवक म्हणून नव्हे, तर नागरिकांचा सेवक म्हणून काम करणार आहे. प्रभाग क्रमांक १० मधील प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. सामाजिक जबाबदारीपासून ते नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही २४×७ उपलब्ध राहू,” अशी ठाम ग्वाही माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी दिली.

शहरात त्यांची एक आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानाची प्रतिमा असून, गेल्या निवडणुकीत शहरात सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरलेल्या उमेदवार म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button