‘आयआयबी’च्या विद्यार्थ्यांचे १५ तास स्वयंअध्ययन!
शिक्षण विश्व: आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट च्या विक्रमी मोहिमेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड | आयआयबी करिअर इन्स्टिटयूट पिंपरी शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांनी विक्रम प्रस्थापित केला. विद्यार्थ्यांनी सलग पंधरा तास स्वयंअध्ययन रेकॉर्ड केले.
पुणे विभागाचे संचालक ॲड.महेश लोहारे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या स्वयंशिक्षण क्षमतेला चालना देण्यासाठी आयआयबी विद्यासंकुल, पिंपरी कॅम्पसमध्ये १५ तास स्वयंअध्ययनाची विद्यार्थी प्रेरित मोहीम (दि. १५) यशस्वीरित्या पूर्ण झाली.
हेही वाचा : केदारनाथ धाम येथे गैर-हिंदूंवर बंदी घाला; भाजपा आमदाराची मागणी
आंतरराष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शिक्षण हाच उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम मार्ग असून, ज्ञानप्राप्तीच्या दिशेने विद्यार्थ्यांचा हा सकारात्मक दृष्टिकोन निश्चितच त्यांना यशाकडे घेऊन जाईल.
– ॲड. महेश लोहारे, संचालक, ‘आयआयबी’ इन्स्टिट्यूट पिंपरी.