Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शेतकरी कर्जमाफीसाठी तडकाफडकी दोन मोठे निर्णय; बँकांना थेट आदेश; सरकारचं सर्वात मोठं पाऊल!

Farmer Loan Waiver : राज्य सरकरने येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेनंतर आता या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता खरीप हंगाम जवळ आला आहे. हंगाम सुरू होण्याआधी लवकर ही कर्जमाफी अमलात आली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबतच आता मोठी माहिती समोर आल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यातील एक निर्णय हा कर्जमाफी संदर्भात आहे. तर दुसरा निर्णय हा क्रॉपलोनसाठीचा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियांणांची, खतांची उपलब्धता तसेच यावेळी पावसाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत काही निर्णयही घेण्यात आले. याबाबत फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. “आम्ही बँकांशी कर्जमाफीच्या बाबतीत चर्चा केली आहे. आपल्याला कर्जमाफी करायची आहे. बँकांनी कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये द्यायची, कर्जमाफी कोणत्या फॉरमॅटमध्ये करायची, अशी एक चर्चा झाली आहे. आम्ही कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे, तो वेळेत कसा पूर्ण करता येईल त्याचंही नियोजन करण्यात आलं आहे, असे फडणवीस यांनी सांगितेल.

हेही वाचा –  मराठा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय, अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी

आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना अतिशय कडक शब्दांत सांगितलं आहे की, शेतकऱ्यांना कोणत्याही सिबीलची मागणी करू नये. बँकांच्या मुख्यालयांनी प्रत्येक शाखेला याबाबत पत्र पाठवले पाहिजे. या पत्रात क्रॉप लोनसाठी सिबीलची अट नाही, हे नमूद असले पाहिजे. आमच्या बैठकीत आरबीआयचे अधिकारी होते. त्यांनीही याबाबत पुष्टी केलेली आहे. कुठल्याही क्रॉपलोनसाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही, असा आदेश देण्यात आलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, आता शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळणे सोपे होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button