ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. शितल वैभव घोटेकर यांना पीएच.डी. पदवी

शिक्षण विश्व:"डीप लर्निंग" च्या साहाय्याने संगीत क्षेत्रात अभिनव संशोधन

पिंपरी चिंचवड : श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्सेस, सीहोर, मध्य प्रदेश येथून शितल वैभव घोटेकर यांनी “डीप लर्निंग च्या साहाय्याने विविध तारवाद्य वाद्यांच्या ध्वनींचे बहुवर्गीय वर्गीकरण करण्याची अभिनव पद्धत” या विषयावर यशस्वी संशोधन पूर्ण करून डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे.

या संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगीत यांचा संगम साधत, विविध भारतीय आणि सतार, व्हायोलिन, गिटार अशा पाश्चात्त्य तारवाद्य वाद्यांचे ध्वनी नमुने संगणक प्रणालीद्वारे विश्लेषित करून, त्या वाद्यांचे अचूक वर्गीकरण करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे. या संशोधनासाठी डीप लर्निंगच्या आधुनिक तंत्रांचा – विशेषतः कॉनव्होल्यूशनल न्यूरल नेटवर्क्स आणि लाँग शॉर्ट-टर्म मेमरीचा वापर करण्यात आला.

हेही वाचा      :        कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान

या संशोधनामुळे संगीत शिक्षण, संगणकाधारित संगीत विश्लेषण प्रणाली, डिजिटल वाद्य ओळख प्रणाली, तसेच भारतीय संगीत वारशाच्या संवर्धनासाठी नवे मार्ग मोकळे होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. वाद्य ओळख प्रणाली, ऑटोमेटेड म्युझिक ट्रान्सक्रिप्शन आणि स्मार्ट म्युझिक अॅप्लिकेशन्स अशा क्षेत्रांमध्ये या संशोधनाचा उपयोग होण्याची मोठी शक्यता आहे.

डॉ. शितल घोटेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व सांगीतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून डॉ. घोटेकर यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देणाऱ्या संबंधित प्राध्यापकांचे देखील विशेष योगदान आहे.

डॉ. शितल वैभव घोटेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबीय, मार्गदर्शक, सहकारी संशोधक आणि संगीत क्षेत्रातील प्रेरणास्त्रोतांना दिले आहे. भविष्यात संगीत व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अधिक सखोल अभ्यास करून या क्षेत्रात योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button