Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चोविस तास पाणी पुरवठा योजना बारगळणार; खोदाईचे आदेश काढण्याचा आयुक्तांचा निर्णय

  • आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केली स्थळाची पाहणी
  • विरोधकांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाची तत्परता

पिंपरी – केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहराच्या काही भागात चोविस तास पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन भूमीगतीकरणाचे खोदकाम केले जात आहे. मात्र, खोदाईमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार विरोधकांनी केल्यानंतर आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खोदाईचे आदेश काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अमृत योजनेंतर्गत शहराच्या काही भागांना चोविस तास पाणी पुरवठा करण्याचे काम हाती घेतले आहे. निगडी प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या काही दिवसांपासून खोदाई केली जात आहे. रस्त्याच्या मधोमध खोदाई केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या खोदाईमुळे स्थानिक नगरसेवकांना प्रभागातील विकास कामे करण्यात अडचणी येत आहे. नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे यांनी मागच्या स्थायी समिती सभेत याविरोधात आवाज उठविला होता. मात्र, संबंधित काम करणा-या ठेकेदाराला खोदाईचे स्पेशल परमिशन दिल्याने परवानगी रद्द करता येत नसल्याचे उत्तर प्रशासनाने दिले होते.

त्यावर विरोधक सदस्यांनी याबाबत पुन्हा आवाज उठविल्याने आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी आज मंगळवारी (दि. 19) तातडीने खोदाई स्थळाची पाहणी करण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत घेतला. दैनंदीन दळणवळणास अडसर ठरत असेल तर संबंधित ठेकेदाराची परवानगी काढून घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे चोविस तास पाणी पुरवठा योजनेचे काम रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button