ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ईको-फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षण विश्व: विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम

पिंपरी चिंचवड : विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये पार पडलेली ईको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरली. पर्यावरण रक्षणाचे भान ठेवून पारंपरिक सण साजरे करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शाडू मातीचा वापर करून गणेश मूर्ती साकारण्याच्या या उपक्रमात सुमारे ५० विद्यार्थी व पालक सहभागी झाले. गणेशमूर्ती घडवताना विद्यार्थ्यांनी सौंदर्य, श्रद्धा आणि सर्जनशीलतेचा संगम अनुभवला. मातीचा गंध, हसऱ्या चेहेऱ्यांचा उत्साह, आणि गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी कार्यशाळेला एक आनंदमय, भक्तिभावपूर्ण वातावरण लाभले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कलात्मकतेस चालना मिळाली नाही, तर पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी यांचे मोलाचे धडेही मिळाले. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीचा पर्याय निवडून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे महत्त्व कार्यशाळेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.

हेही वाचा      :        कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामागे शाळेच्या प्राचार्या पल्लवी शिंदे, शिक्षकवर्ग आणि सहाय्यक कर्मचारी वर्गाचे सहकार्य मोलाचे ठरले. प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता आणि संवेदनशीलता यांचे रोपण करण्यावर भर दिला.

ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. यातून कला, संस्कृती, पर्यावरण आणि आनंद यांचा सुंदर संगम घडून आला असे प्राचार्य शिंदे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button