नळ कनेक्शन तोडण्याची हुकूमशाही कारवाई करू नका
चिखली- मोशी - पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे महापालिका आयुक्तांना पत्र

बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणाचा सोसायटीधारकांना भुर्दंड नको
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील मैला शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या 50 सोसायटीचा पाणीपुरवठा एक जूनपासून तोडण्यात येणार आहे. या सोसायट्यांनी जाणीवपूर्वक एसटीपी बंद ठेवलेला नाही. यामध्ये संबंधित सोसायटीच्या बांधकाम व्यवसायिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरलेला आहे. त्यामुळे महापालिकेने अशी हुकूमशाही पद्धतीची कठोर कारवाई करू नये अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा चिखली- मोशी – पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी आयुक्त शिखर सिंह यांना निवेदन दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील ज्या सहकारी गृहरचना संस्थेमधील मैलाशुद्धीकरण केंद्र काही कारणास्तव बंद आहेत त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने पाण्याचे नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत.
हेही वाचा – वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्याच्या मुलाची जबाबदारी आता कोण घेणार? सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!
पिंपरी चिंचवड शहरातील ज्या काही सहकारी गृह रचना संस्थेमधील मैलाशुद्धीकरण केंद्र बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीमुळे बंद आहेत अशा सोसायट्यांना आपल्या महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने या सोसायट्यांचे एक जून 2025 पासून पाण्याचे नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र पाणी ही नागरिकांची अत्यावश्यक बाब आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ही जी नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली जाणार आहे .ती राबवू नये. महानगरपालिकेकडून ज्या सोसायटीमध्ये एसटीपी आहेत त्यांना आधीच 90 लिटर पर मानसी प्रमाणेच पाणी दिले जात असताना. परत सोसायटीचे नळ कनेक्शन कट करणे याला काही अर्थ नाही.
या ज्या सोसायट्यांचे मैलाशुद्धीकरण केंद्र बंद आहेत त्यांच्या अडचणी समजून घेऊन बांधकाम व्यवसायिकांनी निकृष्ट दर्जाचे बसवलेले मैलाशुद्धीकरण केंद्र यावर विकसकावर कारवाई करावी. चर्चा करून समन्वयाने यातून मार्ग काढावा परंतु कोणत्याही सोसायटीचे पाण्याचे नळ कनेक्शन कट करू नये अन्यथा फेडरेशनच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल .
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पाणी हा नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, पाणी ही गोष्ट अत्यावश्यक असताना पालिका प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे आहेत. मुळातच ज्या सोसायट्यांमध्ये मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत त्या सोसायट्यांना महानगरपालिकेकडून 135 लिटर ऐवजी 90 लिटर पाणी पर मानसी पुरवले जाते. इतर लागणारे पाणी या सोसायट्या टँकर मार्फत विकत घेतात. असे असताना देखील महानगरपालिकेचे आयुक्त हुकूमशाही पद्धतीने सोसायट्यांचे पाण्याचे नळ कनेक्शन कट करण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतात? अशा घटनाबाह्य, नियमबाह्य निर्णयाला आमच्या फेडरेशनचा तीव्र विरोध आहे .अशा प्रकारची कोणतीही कारवाई आम्ही होऊ देणार नाही.
-संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली- मोशी – पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन