वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्याच्या मुलाची जबाबदारी आता कोण घेणार? सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Vaishnavi Hagawane : हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्य केलेल्या वैष्णवी हगवणेला अवघ्या ९ महिन्यांचा मुलगा आहे. आईवाचून हा मुलगा आता पोरका झाला असून त्याच्या भविष्याची चिंता अवघ्या राज्याला सतावत आहे. त्याच्या आईच्या मागे त्याचा सांभाळ कोण करील हा प्रश्न सातत्याने अनेकांच्या मनात उभा राहिला. यावर आता बाल कल्याण समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या ९ महिन्याच्या मुलाचा सांभाळ आता त्याची आजी म्हणजेच वैष्णवी हगवणेची आई करणर आहे. यासंदर्भात महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.
आदिती तटकरे म्हणाल्या, “पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा ९ महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.”
हेही वाचा – १ जूनपासून बदलणार क्रिकेटचे ‘हे’ नियम; तिन्ही फॉरमॅटमध्ये पाहायला मिळणार नवा रोमांच!
“यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवर अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना शुक्रवारी यश आले. त्याने पुण्याहून रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि तेथून नेपाळ गाठल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.