Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतात दाखल; दिल्लीत कडक सुरक्षा

नवी दिल्ली | ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत दीपके आज अमेरिकेतून भारतात परतले आहेत. भारतात पाऊल ठेवताच त्यांनी आज (६ जून) दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाचे नेतृत्व ते स्वतः करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईचा वाढता पाठिंबा पाहता दिल्ली पोलीस हायअलर्टवर आहेत.

अभिजीत दीपके आज सकाळी दिल्ली विमानतळावर लँड झाले. हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन ते विमानतळाबाहेर आले, तेव्हा माध्यमांचे कॅमेरे त्यांच्यावर खिळले होते. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विमानतळावरून ते थेट आंदोलनाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

जंतरमंतरवर होणाऱ्या या आंदोलनात प्रामुख्याने देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असून, देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा

वीजसमस्या सोडवण्यासाठी नगरसेविका कविता भोंगाळे यांचा पुढाकार!

दिल्ली पोलिसांकडून परवानगी; १ हजार जवान तैनात

दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची काळजी घेत ‘कॉकरोच जनता पार्टी’ला जंतरमंतरवर आंदोलन करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. आज ६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे.

जनतेचा आणि विशेषतः तरुणांचा मोठा पाठिंबा लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांसह सुमारे १ हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था (Security Cordoned) ठेवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button