नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवाराच्या वतीने युनिव्हर्सल पासचे वाटप

500 पेक्षा अधिक नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी | प्रतिनिधी
नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक 27 चिंचवडगाव, उद्योगनगर मधील रस्टन काॅलनी, एस.के.एफ. काॅलनी व पवनानगर परिसरातील नागरिकांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 500 पेक्षा अधिक नागरिकांना युनिव्हर्सल पास देण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रभाग क्रमांक 27 चिंचवडगाव उद्योगनगर मधील रस्टन काॅलनी, एस.के.एफ. काॅलनी व पवनानगर येथील कोविडचे दोन डोस झालेल्या रहिवाशांसाठी मोफत ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरास अतीशय चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे 500 पेक्षा जास्त नागरिकांना नगरसेवक अॅड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे यांच्या वतीने ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे’ वाटप करण्यात आले.
प्रभु रामचंद्र सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे राष्ट्रीय सदस्य अॅड. विवेकानंद उजळमकर, रस्टन कामगार वसाहत समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी तोडकर, आ. टी. वाघमारे, मोहन वायकुळे, टाटा मोटोर्स युनियनचे माजी सदस्य व पोलीस मित्र सुभाष मालुसरे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजपाचे मंडल सरचिटणीस नंदूकाका भोगले, अतुल मुनोत, सुरेखा जाधव, स्वप्निल शेडगे, पराग जोशी, अतुल कांबळे, चंदू सांगोळकर यांच्या रस्टन कामगार वसाहत समितीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते.






