TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

देशाबद्दलचे प्रेम आपल्या कृतीतून दिसले पाहिजे ः अजित गव्हाणे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी सैनिकांचा सत्कार

पिंपरी ।  महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । 

देश सेवा करणाऱ्या जवानांच्या कार्याची उंची व महत्त्व खूप मोठे आहे. आपले देशाबद्दलचे प्रेम हे काही दिवसांसाठी मर्यादित न ठेवता ते आपल्या कृतीतून नेहमीच दिसले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केले. दिघी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भारताच्या स्वतंत्रता अमृत महोत्सवा निमित्ताने “जागर राष्ट्रभक्तीच्या जाणीवांचा सन्मान माजी सैनिकांचा” हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

Love for one’s country should be seen in one’s actions – Ajit Gavane

 

युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून व माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांचा सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी १५० माजी सैनकांचा सन्मान करण्यात आला. त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, 75 व्या अमृत महोत्सवी स्वतंत्रता दिना निमित्त शहरात खूप कार्यक्रम झाले. त्यापैकी माजी सैनिकांचा सन्मान करून सर्वात चांगला कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. देश सेवा करणाऱ्या जवानांच्या कार्याची उंची व महत्त्व खूप मोठे आहे. आपण सर्व त्यांच्यासमोर खूप छोटे आहोत. सर्व नागरिकांनी देशाबद्दल प्रेम हे फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट पुरते मर्यादित न ठेवता ते नेहमीच आपल्या कृतीतून दाखवून दिले पाहिजे.

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले “टीव्ही इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात भारतीय युवक भरकटलेल्या अवस्थेत असून स्वतंत्रता आणि पारतंत्रता याचे फरक युवकांना कळावे व युवकांना देशाप्रति आदर निर्माण व्हावा याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देशासाठी बॉर्डरवर आपल्या जीवाची बाजी लावणारे माजी सैनिक यांना सन्मानित करण्याचे ठरवले. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून माजी सैनिकांचे अनुभव युवकांना ऐकावयास मिळतील या संकल्पनेतून हा कार्यक्रम आम्ही घेतला. फक्त बॉर्डरवर जाऊन देश सेवा करता येत नाही तर सामाजिक कामात भाग घेवून, पर्यावरण जपून, सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून त्यांचे प्रश्न सोडवून देखील आपल्याला देशसेवा करता येते असे देखील ते यावेळेस म्हणाले.

या सन्मान सोहळ्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कॅप्टन चव्हाण, कॅप्टन भुसे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, निलेश निकाळजे, युवा नेते राहुल पवार, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. सोनाली गाडगे, युवक उपाध्यक्ष प्रकाश डोळस, लवकुश यादव, तुषार ताम्हणे, रोहित वाबळे, सरचिटणीस दीपक गुप्ता, नितीन सूर्यवंशी, अनुज देशमुख, सचिव ओम शिरसागर, निखिल गाडगे,कुणाल जगताप रुबान शेख, अनिल चव्हाण, सुरज बोराटे, नैनिल रुणवाल, व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button