Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांना समस्या मांडण्यासाठी आता हक्काचे कार्यालय!

चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या नूतन कार्यालयाचे 25 मे रोजी लोकार्पण

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वात मोठी अग्रगण्य अशी सहकारी चळवळ म्हणून चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन नावारूपाला आलेले आहे. फेडरेशनच्या माध्यमातून सोसायटी धारकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, फेडरेशनला आता हक्काची जागा मिळाली आहे. येत्या 25 मे रोजी या फेडरेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. फेडरेशनचे हे कार्यालय म्हणजे सोसायटीधारकांच्या समस्या, प्रश्न आणि मागण्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ठरेल असे फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले.

फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी फेडरेशन बद्दल माहिती दिली. चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ ( सोसायटी फेडरेशन) या सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी काम करणाऱ्या सहकारी संस्थेची स्थापना एक ऑक्टोबर 2016 रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांनी सर्वांनी एकत्र मिळून केली आहे .सोसायटी फेडरेशनची स्थापना झाल्यापासून या फेडरेशनच्या माध्यमातून सोसायटीधारकांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित असणाऱ्या पाणी, वीज, कचरा, रोड याबाबत असणाऱ्या समस्या त्याचप्रमाणे. पिंपरी चिंचवड शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी अनेक गृहप्रकल्पातील नागरिकांना दिलेली आश्वासन पूर्ण न करता प्रकल्प उभारले गेले होते. यावर देखील अनेक गृहप्रकल्पातील नागरिकांना फेडरेशन मार्फत महानगरपालिकेमध्ये त्याचप्रमाणे बिल्डर बरोबर समन्वय साधून काम करून दिलेली आहेत.

या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघामध्ये ( सोसायटी फेडरेशन )मध्ये 1668 सहकारी गृह रचना संस्था (सोसायट्या ) सभासद आहेत. तसेच या संस्थेमध्ये पस्तीस हजार सदनिका ( फ्लॅट )सभासद आहेत.फेडरेशनच्या माध्यमातून 566 सहकारी गृह रचना संस्थांच्या कन्व्हेन्स डीड करून देऊन सातबारा उताऱ्यावर नाव लावून दिलेली आहेत.अनेक सोसायट्याचे बिल्डरच्या बाबतीत असणारे अनेक प्रश्न, समस्या सोडवलेल्या आहेत.

हेही वाचा   :    मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

समस्या सोडवण्याचे हक्काचे कार्यालय..

सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1960 , 1961 नुसार सहकारी गृह रचना संस्था कशा चालवाव्यात याबद्दल फेडरेशन मार्फत मार्गदर्शन केले जाते, सोसायटी मेंटेनन्स, सोसायटी निवडणूक, ऑडिट, देखभाल खर्च वसुली, अशी अनेक कामे फेडरेशनच्या माध्यमातून करून दिली जातात. त्याचप्रमाणे बिल्डर कडून अपूर्ण राहिलेली सर्व काम फेडरेशन कडून करून दिली जातात. महानगरपालिकेकडून कर आकारणी तसेच कचरा,पाणी , वीज याबाबतीतच्या असणाऱ्या सर्व समस्या फेडरेशन मार्फत सोडवल्या गेलेल्या आहेत.

लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा….

नागरी भागातील प्रश्न किंवा समस्या सोडवताना तेथील लोकप्रतिनिधींचे सहभाग महत्वाचा असतो हा सहभाग भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मिळाला. त्यांच्या पुढाकारातून अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सोसायटी धारकांच्या नागरीवस्ती शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून उभारण्यात येणारी कचरा संकलन व वितरण केंद्र फेडरेशन मार्फत आमदार लांडगे यांच्या पाठपुराव्याने बंद करण्यात आलेली आहेत. सोसायटी धारकांवर लादलेला 168 कोटी रुपयांचा उपयोगकर्ता शुल्क फेडरेशनच्या माध्यमातून रद्द करून घेण्यात आलेले आहे. सारथी ॲप मध्ये सोसायटी धारकांना समस्या मांडण्यासाठी वेगळी व्यवस्था फेडरेशनच्या पाठपुराव्याने महानगरपालिकेने केलेली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी अग्रगण्य अशी सहकारी चळवळ म्हणून चिखली- मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन नावारूपाला आलेले आहे. याच संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय, जाधववाडी सीएनजी पंपाच्या समोर, राजगड रो हाऊस नंबर तीन, सेक्टर 13 चिखली प्राधिकरण या ठिकाणी चालू केले जात आहे. फेडरेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते 25 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. हे कार्यालय चालू झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी- पिंपरी- चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button