भारताचा नवा कसोटी कर्णधार ठरला! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

Team India Squad | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची आणि नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर ऋषभ पंत याला उपकर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. आयपीएल 2025 नंतर 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी हा संघ इंग्लंडला रवाना होणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर BCCI समोर नव्या कर्णधार आणि संघ निवडीचे आव्हान होते. निवड समितीने शुभमन गिलवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. गिलने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी पदार्पण केले होते आणि आतापर्यंत 25 कसोटी सामन्यांमध्ये 1497 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : सोसायटीधारकांना समस्या मांडण्यासाठी आता हक्काचे कार्यालय!
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ:
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इस्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
मालिकेचे वेळापत्रक:
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जून 2025 पासून सुरू होईल. या मालिकेत दोन्ही संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग म्हणून भिडणार आहेत.