छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही: संभाजी ब्रिगेड
महाराष्ट्रातील चित्रपटगृहात छावा प्रदर्शित होऊ देणार नाही : सतिश काळे
पिंपरी-चिंचवड: छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज लेझिमवर नाचत असल्याचे आक्षेपार्ह गाणं वगळावे त्यानंतर चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करावा गाणे न वगळल्यास महाराष्ट्रातील चित्रपटगृहात छावा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली तसेच पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त यांना देखील निवेदन देऊन मागणी केली आहे.

काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की छत्रपती संभाजी महाराज असंख्य भारतीयांचा स्वाभिमान आहेत त्यांच्या प्रति सर्व जाती धर्मातील नागरिकांमध्ये आदराची भावना आहे त्यांच्याविषयीचा अवमान खपवून घेणार नाही अशी भूमिका सर्वांची असते नुकतेच अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटातील काही दृश्यांबाबत राज्यभरातून आक्षेप घेतला जात आहे. छत्रपती संभाजी राजे हे एका गाण्यात लेझिमवर नाचताना चित्रपटात दाखविले आहेत तसेच अन्य काही दृश्य अनऐतिहासिक असून हे असंख्य शंभू प्रेमींना न पटणारी गोष्ट आहे ही दृश्ये वगळावीत अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत तसेच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील मागणी केली आहे.
हेही वाचा – गावागावातील समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांची ‘‘ग्राऊंड व्हीजिट’’!
चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी…
इतिहासकारांशी चर्चा करूनच चित्रपट सगळीकडे प्रदर्शित करावा तोपर्यंत या चित्रपटातला बंदी घालावी. पुणे पिंपरी-चिंचवड सह महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृह मालकांना देखील त्याबाबत सूचना द्याव्यात चित्रपटातील अवमानकारक दृश्य न वगळल्यास पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील एकाही चित्रपटगृहात चित्रपट प्रसिद्ध होऊ देणार नाही असा इशारा काळे यांनी दिला तसेच छत्रपती संभाजी राजे यांच्या बाबतचे अवमान कारक अनऐतिहासिक दृश्य न वगळल्यास होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी चित्रपटगृह मालकांची आणि राज्य शासनाची राहील असेही काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदनावर सतीश काळे शहर कार्याध्यक्ष विशाल मिठे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





