Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गावागावातील समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांची ‘‘ग्राऊंड व्हीजिट’’!

जनसंवाद यात्रा : लोणावळा, वडगाव मावळ भागातील गल्ली-गल्लीत भेटी

मावळ : मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून ग्राउंड व्हिजिट देत आहेत . मावळ विधानसभेतील प्रत्येक प्रभागात सध्या ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. प्रत्येक गल्लीतील महावितरण, नगरपरिषद, सार्वजनिक परिवहन, आरोग्य अशा विभागांशी संबंधित नागरिकांची प्रत्येक समस्या ते जाणून घेत आहेत. नागरिकांचा या जनसंवाद दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांनी जनसंवाद दौरा सुरू केला . या दौऱ्याची सुरुवात विधानसभेला सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या लोणावळा शहरापासून करण्यात आली होती. प्रभाग निहाय आमदार सुनील शेळके व त्यांचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरापर्यंत जात त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांची लेखी निवेदने प्राप्त करून घेतली. नगरपरिषद प्रशासन, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कामाबाबतचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

हेही वाचा –  ‘सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार’; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

नागरिकांनी सांगितलेल्या अंतर्गत रस्ते, गटारी, नाले, व्यायाम शाळा व नागरिकांच्या इतर समस्यांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. समस्येची शहानिशा करत तातडीने संबंधित समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

जनसंवाद यात्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत आहेत. प्रत्येक नागरिकाची समस्या समजावून त्याची लेखी निवेदने घेतली जात आहेत. पुढील काही दिवसांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने काम करत विधानसभेतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे.

– सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button